
Produced by : Pasaydaan Creations, Arvind Jog
Subodh Bhave
Sharad Ponkshe
Atul Parchure
Arun Nalawade
Santosh Juvekar
Shailesh Datar
Dr. Sharad Bhutadia
Neelam Shirke
Sharvari Jamenis
Seema Deshmukh
Samira Gujar
(Source: Pasaydan Creations)
सध्या मध्यमवर्गीय माणसाच्या अपेक्षा प्रमाणाबाहेर वाढल्या आहेत. ह्याला खतपाणी घालणाऱ्या वित्तसंस्था, राजकारणी लोक, व्यापारी, भ्रष्ट अधिकारी, शिक्षणाचा व्यापार करणाऱ्या शिक्षण संस्था, सावकार ह्यांच्यामुळे सामाजिक जीवनात निर्माण होणारे पाश माणसाला कसे गुंतवत जातात आणि त्यातून सुटका करण्याचा मार्ग माणूस स्वतःच कसा मिटवत जातो याची ही कथा आहे.
पदु दामले आणि त्याची पत्नी सीमा हे एक मध्यमवर्गीय दाम्पत्य. सुस्तिथित आणि समाधानी असलेला पदु हा महत्वाकांक्षी आणि प्रसिद्ध व्यक्ती व्हावा यासाठी त्याची पत्नी सीमा आजूबाजूच्या लोकांचे खरे-खोटे जाणून न घेता, त्यांच्या यशाला भुलून पदूने असेच प्रयत्न करावेत यासाठी त्याच्या मागे लागत असते. कोणताही कुडमुडा भविष्यकार माणसाचा भविष्यकाळ सांगू शकत नाही, तसेच त्यांनी सांगितलेल्या कोणत्याही अशास्त्रीय खर्चिक उपायांमुळे माणसाला कर्तृत्व मिळत नाही. कोणतेही अवाजवी प्रेम कितीही उत्कटतेने केलेले असले तरीही त्याचे परिणाम भयावह असतात.
खऱ्या शत्रूपेक्षा मोहात पडणारे मित्र ह्यांची संगत ही कोणत्याही माणसाच्या धनाढ्य असो किंवा गरीब, हुशार असो किंवा निर्बुद्ध, ऱ्हासाला कारणीभूत ठरतात. जवळ असलेले सर्व मित्र नसतात आणि लांब असलेले सर्व शत्रू नसतात ही समाजाची व्याख्या ह्यांना उमगलेली नसते.
ह्या कथेमध्ये ह्या सगळ्यांचे चित्रण करण्यात आले आहे. अशा प्रकारचे 'पाश' स्वतःभोवती जखडून घेऊन, त्यातून कुणीतरी येऊन आपली सुटका करेल अशी भाबडी आशा ठेवणाऱ्या माणसांच्या व्यक्तिमत्वाचे चित्रण करण्याचा हा प्रयत्न आहे.